Department of History
सूचना (Notice)
अनाध-निराधार, गरजू व मतिमंद मुला-मुलींनी तयार केलेल्या राख्यांच्या प्रदर्शन व
विक्रीसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना
सहभागासाठी आवाहन...
सर्व शिक्षक, शिक्षकेतर
कर्मचारी व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, बुधवार, दिनांक 6 ऑगस्ट 2025
रोजी सकाळी 9:30 वाजता सामाजिक बांधिलकी आणि मानवतावादी दृष्टीने मदत करण्याच्या आपल्या
महाविद्यालयात इतिहास विभाग व राज्यशास्त्र विभाग आणि सिद्धार्थ सामाजिक विकास
संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमती रजनी कांबळे (अधीक्षक,
सिद्धार्थ सामाजिक विकास संस्था) यांचे मार्गदर्शन
आणि अनाध-निराधार, गरजू व मतिमंद मुलांनी तयार केलेल्या राख्यांचे
प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात येत आहे.
या उपक्रमामध्ये सहभागी होऊन आपण एकीकडे
रक्षाबंधनासारख्या पवित्र सणाला अर्थपूर्ण बनवू शकतो, तसेच गरजू व मतिमंद मुलांप्रती आपली सामाजिक बांधिलकी निभावू शकतो.
या राख्या त्या मुलांनी स्वतःच्या हातांनी बनवल्या असून, त्यांचा
संपूर्ण निधी त्यांच्या कल्याणासाठी वापरण्यात येणार आहे.
शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे
सहभाग नोंदवावा:
1.
राख्या विकत घेऊन मदतीचा हात द्यावा.
2.
सोशल मीडियावर व मित्रपरिवारात या उपक्रमाची माहिती पोहोचवावी.
आपल्या
छोट्याशा मदतीने एखाद्या जीवनात मोठा बदल घडू शकतो.
"राखी विकत घ्या, प्रेमाचा धागा सांभाळा आणि माणुसकीची राखण करा!"
डॉ.अजितकुमार
जाधव
इतिहास विभाग
प्रमुख
|
|
कॅप्टन
डॉ.महेश गायकवाड
प्राचार्य
|